अ.क्र. | मूलभूत माहिती | तपशील |
---|---|---|
1 | स्थापना | 01/04/1982 |
2 | इ-मेल | am_chandvad@msamb.com |
3 | फोन क्रमांक | 02556-223283 |
4 | सूचना क्रमांक | DEV-I/APMC/Lasalgaon/Separation/82 |
5 | अध्यक्षाचे नाव | संजय दगुजी जाधव |
6 | उद्देश | शेतीमालाची योग्यरीत्या विक्री व्हावी, तो बुरशीने खराब होऊ नये, खरेदीदारांना एकत्रित मालाची पुनरावृत्ती करता यावी यासाठी सोयीचे व्हावे आणि चांगल्या दर्जाच्या शेतीसाठी नियंत्रित बाजार क्षेत्राची स्थापना करण्यात आली आहे |
7 | बाजार क्षेत्र | मुख्य बाजार आवार, चांदवड (क्षेत्र 12 हेक्टर 51 आर) |
8 | बाजार परिसर |
बाजार परिसर:- चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे चांदवड हे मुख्य बाजार आवार असुन मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत व चांदवड मनमाड रोडलगत बाजार समितीची स्वमालकीची 12 हेक्टर 51 आर जागा आहे. सदर जागेत बाजार समितीचे मुख्य कार्यालयासह व्यापारी संकुल व इतर बांधकामे केलेली आहेत. सदर बाजार आवारातील वाहनतळाचे संपुर्ण कॉक्रीटीकरण करण्यात आले असुन त्यावर दैनंदिन शेतीमाल लिलाव केले जातात. |
बाजार आवार -
1) मुख्य बाजार आवार, चांदवड (क्षेत्र 12 हेक्टर 51 आर)
चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे चांदवड हे मुख्य बाजार आवार असुन मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत व चांदवड मनमाड रोडलगत बाजार समितीची स्वमालकीची 12 हेक्टर 51 आर जागा आहे. सदर जागेत बाजार समितीचे मुख्य कार्यालयासह व्यापारी संकुल व इतर बांधकामे केलेली आहेत. सदर बाजार आवारातील वाहनतळाचे संपुर्ण कॉक्रीटीकरण करण्यात आले असुन त्यावर दैनंदिन शेतीमाल लिलाव केले जातात. समितीचे मुख्य बाजार आवारावर कांदा, भुसार शेतीमाल व भाजीपाल्याचे दैनंदिन लिलाव होतात. दर रविवारी नागवेली पानांचे लिलाव होतात व दर सोमवारी जनावरे बाजार भरतो. भाजीपाला व नागवेली पानबाजारसाठी चांदवड बाजार समितीत प्रशस्त सेलहॉलची सुविधा करण्यात आलेली असुन कांदा लिलावासाठी स्वतंत्र सेलहॉलची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच कांदा व भुसार शेतीमाल लिलावासाठी स्वंतत्र कॉक्रीटीकरण असलेल्या वाहनतळाची सुविधा केलेली आहे
उपबाजार आवार -
1. वडाळीभोई (क्षेत्र 1 हेक्टर 84 आर)
मा. जिल्हा उपनिबंधक सो., सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील क्रमांक विपणन-1/पणन/कृउबास/चांदवड/86 दि.21/04/1986 अन्वये वडाळीभोई येथे उपबाजार आवार म्हणुन मान्यता मिळालेली असुन त्याची अंतिम अधिसुचना महाराष्ट्र शासनाचे दि.12/06/1986 रोजीचे राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. वडाळीभोई येथे मुंबई-आग्रा महामार्गाच्या उत्तरेस वडाळीभोई-धोडांबे रस्त्यालगत बाजार समितीची स्वमालकीची 1 हेक्टर 84 आर जागा आहे. या ठिकाणी समितीने तळमजला 27 गाळे व पहिल्या मजल्याचे 27 गाळे बांधकाम केलेले असुन त्यातील तळमजल्याचे 4 गाळे नाशिक जिल्हा मध्य. सह. बॅंकेस मासिक भाड्याने दिलेले आहेत. तसेच उर्वरीत गाळे शेतीपुरक व्यावसायिकांना भाडेपट्टयाने देण्यात आलेले आहे. तसेच उपबाजार आवार, वडाळीभोई येथे मुंबई-आग्रा महामार्गावर यश पेट्रोल पंपाजवळील खरेदी-विक्री केंद्रावर दि.15/08/2024 पासुन हंगामी टोमॅटो व भाजीपाला लिलाव सुरु करण्यात आलेले आहे.
2. वडनेरभैरव (क्षेत्र 1 हेक्टर 37 आर)
मा. जिल्हा उपनिबंधक सो., सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील क्र.सीएमआर/आर/12/वडनेरभैरव/76 अन्वये लासलगाव बाजार समिती अंतर्गत वडनेरभैरव येथे उपबाजार आवारास मान्यता मिळालेली आहे. याबाबतची अधिसुचना महाराष्ट्र शासनाचे दि.11/11/1976 रोजीचे राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. वडनेरभैरव येथे समितीची 1 हेक्टर 37 आर जागा स्वमालकीची आहे. सदर उपबाजार आवारावर दैनंदिन भाजीपाला नियमित सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना माल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी शेतमाल लिलावासाठी सेलहॉलची सुविधा आहे.
3. रायपुर (क्षेत्र 2 हेक्टर 73 आर)
मा. जिल्हा उपनिबंधक सो., सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील क्रमांक पणन-1/कृउबास/चांदवड/रायपुर/उपबाजार/वस्तु व इतर/कलम4/अंतिम अधिसुचना/4152/सन 2021 दि.26/02/2021 अन्वये रायपुर येथे उपबाजार आवार म्हणुन मान्यता मिळालेली असुन त्याबाबतची अंतिम अधिसुचना महाराष्ट्र शासनाचे जुलै 29 ते ऑगष्ट 4, 2021 या राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. बाजार समितीने रायपुर ता.चांदवड येथे स्वमालकीची 2 हे.73 आर. जागा खरेदी केलेली आहे. त्या ठिकाणी मुलभूत व पायाभुत सुविधा उभारणी करण्यात येऊन नियमित शेतमाल लिलाव सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
शेतीमाल विक्रीची पद्धत
कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड ही ग्रामीण भागातील शेतक-यांची विश्वासपात्र अशी बाजारपेठ असुन बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारावर विक्रीस येणारा शेतीमाल हा उघड लिलाव पद्धतीने विक्री केला जातो. बाजार समितीचे सेवक लिलावाचे ठिकाणी उपस्थित असतात व त्यांचे मार्फत माल विक्रीची नोंद ठेवली जाते. समितीचे मुख्य बाजार आवारावर प्रामुख्याने कांदा, भुसार शेतीमाल, नागवेली पाने, भाजीपाला व जनावरे यांचे खरेदी-विक्रीचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. बाजार समितीत शेतीमाल विक्री केल्यानंतर माल विक्रीची रक्कम तात्काळ रोख स्वरुपात अदा केली जाते. त्यामुळे शेतीमाल विक्री होवून शेतक-यांना लवकरात-लवकर घरी जाता येत असल्याने तालुका व तालुक्याबाहेरील, तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकरी बाजार समितीत शेतीमाल विक्रीस पसंती देतात. माहिती तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात दैनंदिन शेतीमाल खरेदी-विक्रीचे लिलाव पद्धतीत काळानुरुप बदल करणे आवश्यक असल्याने सदरची प्रक्रिया ऑनलाईनरित्या करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेची संगणकीय लिलाव पद्धतीची अंमलबजावणी सुरु असुन प्रथमतः भुसार शेतीमालासाठी ई-लिलाव सुरु करणेकामी बाजार समिती व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. तसेच बाजार समितीने लिलाव प्रक्रियेसाठी स्वतःची संगणक प्रणाली देखील खरेदी केली असुन त्याची अंमलबजावणी सुरु आहे.
लेखापरिक्षण
बाजार समितीचे सन 2022-23 चे लेखापरिक्षण श्री.अे.के.पाटील, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था, नाशिक यांनी केलेले असुन सन 2023/24 चे लेखापरिक्षण लवकरच सुरु होणार आहे.
अनुज्ञप्ती प्रकार | सन 2022-23 | सन 2023-24 |
---|---|---|
जनरल कमिशन एजंट | 173 | 189 |
अ वर्ग खरेदीदार व्यापारी | 184 | 214 |
जनावरे अ वर्ग खरेदीदार | 54 | 62 |
मापारी | 30 | 30 |
हमाल | 79 | 79 |
एकुण | 520 | 574 |