कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड मध्ये आपले स्वागत आहे
बाजार समिती स्थापनेचा उद्देश
शेतकरी बांधवांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावे, शेतक-यांना उत्पादित शेतीमाल विक्रीची जवळची उत्तम
व्यवस्था निर्माण व्हावी, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख स्वरुपात 24 तासाचे आत माल विक्रेत्यास
मिळावा,
शेतकरी वर्गाची शेतीमाल विक्रीत आर्थिक फसवणुक अथवा पिळवणुक होऊ नये, अनाधिकृत रित्या सुट अथवा कटती इ. प्रकार
बंद व्हावेत, सर्व बाजार घटकांच्या हिताची जपणुक व्हावी इ. उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली
आहे. बाजार समितीमुळे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मीती झाली आहे. तसेच शेतीपुरक व्यवसायास चालना मिळाली आहे.